नागपुरातील हॉकीच्या मैदानाची दुरावस्था
नागपुरातील हॉकीच्या मैदानाची दुरावस्थासंजय डाफ

नागपुरातील हॉकीच्या मैदानाची दुरावस्था

संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या भांडणात मैदान दुर्लक्षित

नागपूर - एकीकडे राष्ट्रीय पुरुष हॉकी Hockey संघाने ऑलम्पिकमध्ये Olympics कांस्य पदक जिंकल्याचा आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे हॉकीच्या देशातील असलेल्या मैदानाची Ground अवस्था वाईट आहे. विदर्भ हॉकी असोसिएशनचे नागपुरातील Nagpur मैदान त्यातीलच एक. देशातील हॉकीसाठी स्वतःच्या मालकीचे हे एकमेव मैदान आहे. मात्र, आज हे मैदान मरणासन्न अवस्थेत आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे देशभर आनंद साजरा केला जात आहे. मात्र, या नागपुरातील विदर्भ हॉकी असोसिएशनचे हॉकी मैदान मरणासन्न अवस्थेत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फटका या मैदानाला बसला आहे.

हे देखील पहा -

गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहे. हा वाद आता न्यायालयात गेला आहे. त्यामुळे विदर्भ हॉकी असोसिएशन मध्ये प्रशासक नेमला आहे. मात्र, या प्रशासकांचे या मैदानाकडे अजिबात लक्ष नाही. परिणामी या मैदानाची अवस्था वाईट झाली आहे.

पदाधिकाऱ्यांचा वाद सुरू आहे, प्रशासकाचं लक्ष नाही, खेळाडूंना सराव करता येत नाही आहे. त्यामुळं शहरातील काहीजण हे मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी पूढे आले आहेत. या मैदानाची अवस्था बघून शहरातील आंबेडकर महाविद्यालय या मैदानातील गवत कापून ते खेळाडूंना खेळण्यायोग्य करणार आहेत.

नागपुरातील हॉकीच्या मैदानाची दुरावस्था
डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालोय - निलेश लंके

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेले हे मैदान आज मरणासन्न अवस्थेत आहे. आज एकीकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्ट्रो ट्रॅक वर खेळताहेत. मात्र, भारतात आहे ते मैदान सुद्धा धड नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे.

Edited BY - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com