Cctv footage of highway accident SAAM TV
मुंबई/पुणे

Accident CCTV Video: बाईक घसरली अन् डोकं थेट डंपरच्या चाकाखाली, कल्याण–मुरबाड रोडवर भयंकर अपघात

Cctv footage of highway accident: कल्याण-मुरबाड रोडवर डंपर आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेनंतर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रस्त्यावर अनेक भीषण अपघातांबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. असाच एक भीषण अपघात कल्याण मुरबाड रोड वरप गावाजवळ झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ रस्त्यालगत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या अपघातात २५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

डंपर आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अघघात

कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडामध्ये झालेल्या डंपर आणि मोटरसायकल यांच्यात भीषण धडक होऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. वैभव साहेबराव भामरे असं मृत तरुणाचं नाव असून तो मालेगावहून आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी वरप गावी आला होता.

२७ सेकंदांचा व्हिडीओ समोर

हा बाईकस्वार रस्त्याववरून जात असताना त्याची बाईक घसरली. यावेळी उजव्या बाजूने एक लोडेड डंपर येत होता. हा तरूणाचं डोकं डंपर खाली आलं. हा तरूण डंपरखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहून आजूबाजूला असलेल्यांनी धाव घेतली.

अपघाताचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अपघातावेळी ओव्हरलोड डंपर खाली आल्याने हा दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अनधिकृत आणि ओव्हरलोड डंपर दिवसभर धावत असल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करतायत. संबंधित डंपर चालकांवर आणि मालकांवर कडक कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Maharashtra News Live Update : आंबोलीत भटक्या कुत्र्यांचा सांबरच्या पिल्लावर हल्ला

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

SCROLL FOR NEXT