Chembur Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: परीक्षेत कॉपी करताना शिक्षकाने पकडलं, 9 वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल...

Chembur Crime News: याप्रकरणी चेंबूर पोलिस (Chembur Police) ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: कॉपी करताना शिक्षकाने पकडले त्यामुळे नैराशेत येऊन एका विद्यार्थिनीने आत्महत्या (Student End Her Life) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या (Mumbai) चेंबूर (Chembur News) परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस (Chembur Police) ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. ही मुलगी नववीमध्ये शिकत होती. तिच्या शाळेमध्ये सध्या परीक्षा सुरु आहे. परीक्षेवेळी या मुलीला शिक्षकाने कॉपी करताना पकडले. या शिक्षकाने मुलीच्या आईला याची माहिती दिली. यातून नैराशेत आलेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले. तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

शिक्षकाने पेपरला कॉपी करत असल्याची बाब आईला सांगितल्यामुळे मुलीला खूप वाईट वाटले. तिने पेपरवरुन घरी आल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT