Congress and BJP  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : भाजप सरकार ओबीसी विरोधी आहे का? जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक

राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली.

Rashmi Puranik

Nana Patole News : ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. (Latest Marathi News)

नाना पटोले म्हणाले की, मी विधानसभेचा अध्यक्ष असताना ८ जानेवारी २०२० रोजी जातनिहाय जनगणना करावी असा ठराव एकमताने पारित केला होता. असा ठराव करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर इतर राज्यांनीही तसे ठराव केले. आज विधानसभेत जातनिहाय जनगणनेची मागणी केली पण सरकारच्या वतीने मंत्र्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजप सरकार ओबीसी विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो'.

सभागृहात अध्यक्ष विरोधी पक्षाच्या सदस्यांची मुस्कटदाबी करत आहेत. हे अध्यक्ष जास्त दिवस खुर्चीवर राहिले तर सदस्यांच्या अधिकारावर घाला घातला जाईल. सभागृहात सर्व सदस्यांना संधी मिळाली पाहिजे पण तसे होत नाही म्हणून आम्ही त्यावर चर्चा केली असून नियम तपासून अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा विचार करत आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.

'सभागृहात आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, शेतकरी, बेरोजगारी, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्व विभागातील प्रश्न मांडले. सर्व संसदीय आयुधांचा वापर करुन सरकारला जाब विचारला आहे, आता सरकार काय उत्तर देते ते पाहुया, असे देखील नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT