Eleventh Class Admission saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतल्या सोमय्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा, ५५ मुलांकडून प्रत्येकी ३ लाख उकळले

K. J. Somaiya : प्राचार्यांमुळे सोमय्या कॉलेजमधील अॅडमिशन घोटाळा उघडकीस आलाय. ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३ लाख रूपये उकळल्याचे समोर आलेय. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टाने आरोपींना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Maharashtra Crime News : मुंबईमधील शाळेत अॅडमिशनचे मोठं रॅकेट उघडकीस आलेय. विद्याविहार येथील के.जी सोमय्या कॉलेजमध्ये (K.J. Somaiya College) मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली ५० ते ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते तीन लाख उकळल्याचे उघड झालेय. अकरावीच्या अॅडमिशनवेळी मुंबईतल्या विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आल्याचं समोर आलेय. पोलिसांनी या प्रकरणी कॉलेजमधील कर्मचार्‍यांसह तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, फक्त एकाच कॉलेजमध्ये असं रॅकेट आहे की अन्य कॉलेजचाही समावेश आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

अकरावीच्या अॅडमिशनसाठी सोमय्या महाविद्यालयात (K.J. Somaiya College) बोगस गुणपत्रिका आणि बनावट शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देण्यात आला. त्यासाठी प्रत्येकाकडून दोन ते तून लाख रूपये उकळण्यात आल्याचं समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, ५० ते ५५ विद्यार्थांच्या पालकांकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये घेऊन प्रवेश दिला. महाविद्यालय प्रशासनाच्या तपासात २४ विद्यार्थ्यांचे बोगस मार्कशीट बनवून त्यात मार्क वाढवल्याचे समोर आलेय.

तिलक नगर पोलिसांनी या प्रकरणी सोमय्या महाविद्यालयातील दोन क्लर्कसह तीन जणांना अटक केली आहे. महेंद्र पाटील अर्जुन, राठोड आणि देवेंद्र सादे अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. यातील देवेंद्र सादे हा एजंट आहे, तर इतर दोघे सोमय्या कॉलेजमधील क्लर्क आहेत.

पोलिसांनी मंगळवारी या रॅकेटचा पर्दाफाश केला. कमी गुणांमुळे प्रवेश न मिळाल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गाठून मुलांना सोमय्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगत प्रत्येकाकाडून दोन ते तीन लाख रूपये घेतले. महाविद्यालयातील क्लर्कला हाताशी धरून सोमय्या महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करण्यात आल्याचे तपासात उघड झालेय. त्याशिवाय CBSC, IB, ICSE, IGCSE व इतर शैक्षणिक बोर्डाच्या चेअरमनची सही व लोगो असलेले खोटे मार्कशिट तयार केले.

ऑनलाईन प्रवेशावेळी जनरेट होणारा लॉगीन आयडी व पासवर्ड स्वतः कडे ठेवला अन् सर्व माहिती सरकारी पोर्टलवर अपलोड केली. सोमय्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर त्यांनी एक कमिटी नेमली अन् चौकशी केली. त्यामध्ये २४ विद्यार्थ्यांची गुणपत्रिका बोगस असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले अन् मोठं रॅकेट उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT