मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय आज, शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांकडे आणखी एक मागणी केली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भूमिपुत्रांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, असे राजू पाटील यांनी सांगितले. (MNS MLA Raju Patil News)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थगिती देऊन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय नव्याने घेतला. या निर्णयानंतर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याच संदर्भातील एक मागणी केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्या भूमिपुत्रांवर आघाडी सरकारने टाकलेल्या सर्व केसेस या सरकारने काढून टाकाव्यात, अशी मागणी राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विटद्वारे केली आहे. या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि. बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.