Ulhasnagar Crime News  saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Faction : उद्धव ठाकरे गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल; पाहा रे तो व्हिडिओ, पाेलिसांच्या कारवाईवर शंका

या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला हाेता.

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर (Ulhasnagar Latest News) येथे ठाकरे गटाच्या महिलांनी मटक्याच्या अड्ड्याची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मटक्याचा अड्डा सुरू नसतानाही केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी हे आंदोलन (aandolan) करण्यात आल्याचा आरोप महिलांवर करण्यात आला आहे. (Maharashtra News)

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील जय जनता कॉलनीत एका गाळ्यात जुगार अड्डा सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी २१ मार्च रोजी तोडफोड केली होती. कैलास तेजी आणि जया तेजी यांच्यासह जवळपास २५ ते ३० महिलांनी ही तोडफोड केली होती. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गाळ्यात जुगाराचा अड्डा सुरू नसतानाही केवळ राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे जामीनपात्र असल्यानं त्यांना अटक न करता फक्त नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोपट कराडकर (पोलीस निरीक्षक) यांनी दिली.

दरम्यान, या महिलांनी तोडफोड करताना चित्रित केलेल्या व्हिडिओत जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य आणि तसे स्टिकर्स असलेले टेबल दिसत आहे. त्यामुळं पोलिसांच्या या कारवाईवरही साशंकता व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

पूर्णेकरहत्येनंतर ठाण्यात आणखी एका शिवसेनेच्या दिवंगत नगरसेवकाच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकी

Maharashtra News Live Update: दुष्काळाचे पंचनामे वेगाने सुरु आहेत- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले, तिरंगा फडकावला; 140 खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा|VIDEO

Liver: गोड खाण्याची आवड लिव्हरवर पडतेय भारी, 'हे' संकेत वेळीच ओळखा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT