Dombivli BJP-MNS Morcha
Dombivli BJP-MNS Morcha Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli BJP-MNS Morcha: भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, भाजप-मनसे कार्यकर्ते धडकले पोलीस ठाण्यावर

Priya More

अभिजीत देशमुख, डोंबिवली

Dombivali News: डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी (Nandu Joshi) यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचा निषेध केला. खोटा गुन्हा रद्द करण्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

एका महिलेने भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर नंदू जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संतप्त होत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने यावेळी एसीपीची भेट घेतली. याबाबत एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडून सुरू असून या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान राज्यात भाजपचे सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे असताना भाजपचे पोलिसांविरोधतील आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मानपाडा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभाी झाले होते. मोर्चादरम्यान मानपाडा पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निलंबनाची मागणी केली. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने एसीपी सुनील कुऱ्हाडे यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, 'हा खोटा गुन्हा आहे. हा गुन्हा रद्द व्हावाच. मात्र तसेच मानपाडा पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जी वागणूक मिळते त्यात सुधारणा व्हायला हवी.' तसंच, 'सरकार आमचं असलं तरी आम्ही सरकारविरोधात घोषणा दिलेल्या नाहीत. आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडून सुरू असून या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आम्ही भाजप शिष्टमंडळाला दिल्याचे एसपी सुनील कुऱ्हाडे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

SCROLL FOR NEXT