नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल Saam Tv News
मुंबई/पुणे

नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

या यात्रेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरज सावंत

मुंबई : भाजपच्या नेत्यांकडुन राज्याभरात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. भाजप नेते तथा लघु, सुक्ष्म व मध्यम उद्याेग मंत्री नारायण राणे यांनी देखील काल मुंबईत जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. या यात्रेत भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने भाजप कार्यकर्त्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Case have been registered in Mumbai in connection with Narayan Rane's Jan Ashirwad Yatra)

हे देखील पहा -

जन आशीर्वाद यात्रे निमित्त नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मुंबईत गुरूवारी विविध पोलिस ठाण्यात १९ गुन्हे नोंदवले असतना, शुक्रवारी पश्चिम उपनगरात काढलेल्या यात्रे प्रकरणी पोलिसांनी १३ नवे गुन्हे नोंदवले आहेत. हे गुन्हे कार्यकर्त्यांवर आणि आयोजक व नगरसेवकांवर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यात सांतक्रूझ १, खार १, पंतनगर १, मुलुंड १, भांडुप १, विक्रोळी १, घाटकोपर २, चारकोप १, मेघवाडी १, साकीनाका १, पवई १, एमआयडीसी १ असे १३ गुन्हे नव्याने नोंदवले दाखल केले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून भाजपतर्फे जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मोदी सरकारचे काम, निर्णय, महत्वाच्या योजना आणि जनसंंपर्क वाढवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि मंत्री राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही जन आशीर्वाद यात्रा काढली होती. भाजपच्या या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेनेकडून विरोध होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT