Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Bhayandar Crime News : माता न तू वैरिणी! आधी प्यायली दारू, नंतर पोटच्या मुलींसोबत केलं भयानक कृत्य; काळीमा फासणारी घटना

Drunk Mother Beats her Daughters: या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Bhayandar News : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता भाईंदर येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

दारू पिऊन स्वतःच्या अल्पवयीन मुलींना नेहमी मारहाण करणाऱ्या आईविरुद्ध भाईंदरच्या (Bhayandar) नवघर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, निमई बाऊर ( ३९ ) हे भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ८ मधील सिद्धिविनायक टॉवरमध्ये पत्नी सुदेसना (३३) आणि २ मुलींसोबत राहतात. निमई हे मुंबईच्या झवेरी बाजार भागात दागिने डिझाईन करायचे काम करतात . निराली हि ६ वीत तर नायेरा सिनियर केजी मध्ये शिकतेय .

गेल्या ८ वर्षांपासून सुदेसना हिला दारूचे व्यसन जडले असून ती दारू पिऊन नेहमी पती निमई व मुलींना मारझोड, शिवीगाळ करत होती. २५ फेब्रुवारी रोजी निमई हिने आपल्या दोन्ही मुलींना जबर मारहाण केली. त्यानंतर दोन्ही मुली निमईचे मित्र अमोल माहेती याच्या घरी गेल्या. अमोलने निमईला कॉल करून सांगितले की, तुझ्या दोन्ही मुली माझ्या घरी आल्या असून त्यांच्या हाता पायाला खूप लागलेले आहे .

निमई हे कामावरून लगेच निघाले व मित्रा कडे पोहचले. दोन्ही मुलींना त्यांच्या आई सुदेसना हिने जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ छोट्या मुलीने वडिलांना दाखवला. दोन्ही मुलींवर औषधोपचार करून निमई हे घरी पोहचले. त्यांनी सुदेसना हिला मुलींना मारहाण केल्याचा जाब विचारला असता तिने पतीला शिवीगाळ केली.

निमई यांच्या फिर्यादी वरून सुदेसनावर अल्पवयीन मुलींना मारहाण केल्या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

AC Fridge Price Hike: २०२६ च्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका; AC, फ्रिजच्या किंमती वाढल्या

एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसर्‍याचा AB फॉर्म गिळला अन् विषयच संपवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

SCROLL FOR NEXT