Shruti Vilas Kadam
पिकलेलं डाळिंब, अर्धा कप पाणी, चवीनुसार साखर किंवा मध, आणि थोडा लिंबाचा रस घ्या.
डाळिंब सोलून स्वच्छ दाणे वेगळे करा. पांढरा भाग काढून टाकल्यास ज्यूस कडू होत नाही.
मिक्सर जारमध्ये डाळिंबाचे दाणे घाला. जास्त वेळ फिरवू नका, नाहीतर ज्यूस कडू होऊ शकतो.
थोडं पाणी घाला आणि चवीनुसार साखर किंवा मध घाला. पुन्हा एकदा हलकं ब्लेंड करा.
ब्लेंड केलेला रस गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून बीया वेगळ्या होतील.
ज्यूसमध्ये काही थेंब लिंबाचा रस घातल्यास चव वाढते आणि ताजेपणा येतो.
डाळिंबाचा ज्यूस बनवल्यानंतर लगेच प्यावा. गरज असल्यास थंड करण्यासाठी बर्फाचे तुकडे घालू शकता.