IAS Pooja Khedkar, Deelip Khedkar, Manorama Khedkar, Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: मोठी बातमी! IAS पुजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

IAS Pooja Khedkar Latest News Update: वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि वडीलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Satish Kengar

नितीन पाटणकर, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना धमकावणे, मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची दमदाटी आणि शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याच्या आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्या बरोबर अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महीला, दोन पुरुष आणि गुडांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जून २०२३ रोजी मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याची घटना घडली होती. याचाच एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मनोरमा खेडकर या शेतकऱ्यांवर पिस्तूल दाखवत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्ह्यात प्रोबेशन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारीम्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशिक्षणादरम्यान, त्यांनी प्रशासनाचे कामकाज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी रुजू होण्यापूर्वीच अनेक वादग्रस्त मागण्या केल्याचा आरोप आहे.

त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतरही त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने तक्रार करत राहिल्याचा आरोप आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीही केल्या. यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तत्कालीन मुख्य सचिवांकडे तक्रार केली. यानंतर आता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

Shukra Gochar 2025: 'या' ३ राशींना होणार भलं; नोकरीत बढती आणि व्यवसायत होईल भरभराट

SCROLL FOR NEXT