मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरून तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन परदेशी महिलांना अटक Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरून तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून ड्रग्जविरोधात कारवाईने चांगलाच जोर धरला असल्याचे पाहायला मिळत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra मागील काही दिवसांपासून ड्रग्जविरोधात कारवाईने चांगलाच जोर धरला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई Mumbai आतंरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने Custom department तब्बल २० कोटी रुपयांचे ४ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी २ परदेशी महिलांनादेखील अटक Arrested करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

कस्टम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर Chhatrapati Shivaji Maharaj International Airport मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये २ परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विमानतळावर संबंधित महिलांकडे २० कोटी रुपयांचे ४ किलो हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचा Uganda पासपोर्ट देखील आढळून आला आहे.

कस्टम्स विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर २० कोटी किंमतीचे ४ किलो हेरॉइन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या महिलांकडे ड्रग्ज आढळून आले आहे. त्यांच्याकडे युगांडाचा पासपोर्ट आढळला आहे. अटक केलेल्या महिलांची नावे क्यांगेरा फातुमा आणि तिची मुलगी मान्सिम्बे जयानाह अशी आहेत. त्यांनी जुबा सूडान ते दुबई Dubai आणि दुबईवरुन मुंबई असा प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे.

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर या महिलांना अटक केल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने court या आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT