Aditya Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Vs Shinde: आदित्य ठाकरे ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करु शकतील का? कुणाचं पारडं जड? वाचा सविस्तर

Aditya Thackeray Vs Eknath Shinde : ठाण्यातलं राजकीय समीकरण आणि एकनाथ शिंदेच्या राजकीय ताकदीपुढे आदित्य ठाकरेंना हा विजय शक्य आहे का? यावर एक नजर टाकूया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढण्याचे संकेत देत ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवू, असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून निवडणूक लढवली तर ते जिंकू शकतात का? ठाण्यातलं राजकीय समीकरण आणि एकनाथ शिंदेच्या राजकीय ताकदीपुढे आदित्य ठाकरेंना हा विजय शक्य आहे का? यावर एक नजर टाकूया.

ठाण्यातील कोपरी पाचपखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. 2004 साली त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीनवेळा एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय

एकनाथ शिंदे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 1 लाख 13 हजार 497 मतं मिळाली. त्यांच्या पाठोपाठ दोन नंबरला कॉंग्रेसच्या उमेदवाराला अवघी 24 हजार 197 इतकी मतं मिळवता आली होती. म्हणजेच एकनाथ शिंदे 89 हजार 300 मताधिक्याने विजयी झाले होते. (Political News)

67 पैकी 66 नगरसेवक शिंदे गटासोबत

ठाण्यात एकनाथ शिंदेंची एकहाती सत्ता आहे. आनंद दिघे असताना बाळासाहेब ठाकरे ठाण्याकडे फार लक्ष देत नसत. तीच परंपरा नंतरही कायम राखली गेली होती. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याची पूर्ण जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आपल्या मतदारसंघासोबत एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक होते, त्यापैकी तब्बल 66 नगरसेवक सध्या शिंदे गटासोबत आहेत. यावरुन एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील राजकीय ताकदीचा अंदाज लावता येऊ शकतो.

आदित्य ठाकरेंचं राजकीय वजन

दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे नावाचा ब्रॅन्ड आहेच. नुसतं नाव नाही तर यांची आदित्य ठाकरे यांची राजकीय कारकीर्द उत्तम आहे. कारण 2019 सालचा वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना एकूण 89,248 मतं मिळाली होती. त्यांच्या पाठोपाठच दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश माने यांना 21,821 इतकी मतं होती. म्हणजेचे आदित्य ठाकरेंचा 67,427 मताधिक्याने विजय मिळाला होता.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे अवघा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सोबतच बंडखोरी, सत्तांतर, निवडणूक आयोगाचा निकाल, न्यायालयातला संत्तासंघर्ष आणि उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती याचा फायदाही आदित्य ठाकरेंना मिळू शकतो. तसेच आदित्य ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही मदत मिळेल. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात थेट सामना झाला तर ही निवडणूक अटीतटीची होईल यात शंका नाही.(Maharashtra Breaking News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT