Maharashtra Cabinet Meeting Decisions  Saamtv
मुंबई/पुणे

Cabinet Decision : मुली होतील लखपती; शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

Cabinet Meeting Decision : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत महत्त्वाचे ७ निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुलींच्या जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी याबाबत सांगितलं की, मुलींच्या जन्मदर वाढीसाठी जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात सरकारने वाढ केली आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.

सरकारच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ हजार, दुसऱ्या टप्प्यात ६ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ८ हजार मिळणार आहेत. (Latest Marathi News)

लेक लाडकी योजना काय आहे?

लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारका कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये मिळणार. मुलगी पहिलीती गेल्यावर ६ हजार रुपये मिळणार. सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये मिळणार. अकरावीत ८ हजार रुपये मिळणार. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहेत. अशारितीने मुलींना १ लाख १ हजार रुपये मिळतील.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. (महिला व बालविकास)

  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. (जलसंपदा विभाग) (Political News)

  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग)

  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार (परिवहन विभाग)

  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन (महसूल व वन विभाग)

  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता (उच्च व तंत्र शिक्षण)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT