Ajit Pawar: 'म्हणून महायुतीत गेलो...' सत्तासंघर्षाच्या १०० दिवसपूर्तीनंतर अजित पवारांचे जनतेला पत्र; काय काय म्हणाले?

Maharashtra NCP Crisis: अजित पवार गट सत्तेत सहभागी होवून १०० दिवस पुर्ण झाले. याच निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधत भलेमोठे पत्र लिहले आहे.
Maharashtra Politics ajit pawar News
Maharashtra Politics ajit pawar News Saam TV
Published On

रुपाली बडवे, प्रतिनिधी

Ajit Pawar News:

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट बाहेर पडला अन् सत्तेत सहभागी झाला. अजित पवारांच्या या बंडाने राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून निवडणुक आयोगासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. तत्पुर्वी अजित पवार गट सत्तेत सहभागी होवून १०० दिवस पुर्ण झाले. याच निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख असलेले भलेमोठे पत्र लिहले आहे.

अजित पवारांचे पत्र त्यांच्याच शब्दात...

अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे.

म्हणून महायुतीत गेलो...

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला.

Ajit Pawar Letter
Ajit Pawar Letter Saamtv

वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं 'बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व' हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे.

याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला 'वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा' हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे, यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो. (Latest Marathi News)

Maharashtra Politics ajit pawar News
Mumbai Local Train: बापरे! धावत्या ट्रेनमध्ये महिला टीसीला मारहाण; तिकीट दाखवा म्हणताच लगावली कानशिलात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com