Farmer  Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 1500 कोटींच्या निधीला मंजुरी; ग्रामसेवक आणि विद्यार्थ्यांसाठीही खूशखबर

Farmer News : मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन सुधारित दाराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी ८ हजार ५०० तर बागायत जमिनीसाठी १७ हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.  (Latest Marath News)

शाळकळी विद्यार्थ्यांसाठीही राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Political News)

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. 1500 कोटींची मान्यता (मदत व पुनर्वसन विभाग)

  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये. (ग्राम विकास)

  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार. (पशुसंवर्धन विभाग)

  • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. (विधि व न्याय विभाग)

  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ. (विधि व न्याय विभाग)

  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना. (दिव्यांग कल्याण विभाग)

  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवली. (महसूल विभाग)

  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार. (महसूल विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT