Byculla-Mazgaon Flyover Saam Tv
मुंबई/पुणे

Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

Byculla-Mazgaon Flyover Work Update: मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. भायखळा ते माझगावदरम्यान दोन उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

भायखळा ते माझगाव फक्त १० मिनिटात

दोन उड्डाणपूल बांधणार

वाहतूक कोंडी कायमची संपणार

मुंबईत नेहमी वाहतूक कोंडी होत असते. प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता मुंबई महापालिकेने गर्दी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आता भायखळा आणि माझगावला जोडणारे नवीन पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलांमध्ये या भागात आजिबात गर्दी होणार नाही.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर भायखळा ते माझगाव या परिसरात खूप गर्दी होते. यासाठीच भायखळा येथे ९१६ मीटर लांब केबल स्टेड पूल बांधण्यात येणार आहे. हाच पुल पुढे माझगावला जोडण्यात येणार आहे. हा पूल ८९२ मीटर लांब असणार आहे. या दोन्ही पुलांमध्ये मुंबईतील वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

भायखळ्यात १०३ वर्ष जुन्या वाय पुलाच्या जागी नवीन केबल स्टेड पुल बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भायखळा ते माझगाव थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने वाहनचालकांचा रिचर्डसन, क्रुडाल जंक्शन आणि सब्बू सिद्दीकी जंक्शनमधून जावे लागते. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. या नवीन पुलामुळे हीच गर्दी कमी होणार आहे. यामुळे जेजे उड्डाणपुलापासून आणखी एक नवीन पुल तयार केला जाणार आहे.

१० मिनिटांत प्रवास

केबल स्टेड पुल सहा पदरी असणार आहे. एकूण ९१६ मीटर लांब असेल. याचनंतर दुसरा उड्डाणपुल असणार आहे. हा ८४८ मीटर लांब असून ४ पदरी असेल. यामुळे सीएसएमटी ते भायखळा अंतर कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ३० ते ४५ मिनिटांवरुन १० मिनिटांवर येणार आहे.

केबल स्टेड पुलाचे काम ७८ टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०२६ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे.हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

ODI ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा; प्रिन्स गिलने किंग कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर?

SCROLL FOR NEXT