Sugarcane factory
Sugarcane factory Saam TV
मुंबई/पुणे

'या' तारखेपर्यंत राज्यातील संपुर्ण ऊसाचं गाळप होणार; साखर आयुक्तांची माहिती

विश्वभूषण लिमये

पुणे : महाराष्ट्रामध्ये सध्या जवळपास २५ लाख टन ऊस (Sugarcane) उभा असून उसाचा हंगाम संपायला आणखी अवधी आहे. १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण ऊस गाळला जाईल, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी आज केलं आहे.

बीड जिल्ह्यात (Beed District) तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत, ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिरीक्त ऊसाचा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. तर तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यामुळे आता कारखाने बंद झाले तर करायचं काय असा प्रश्न देखील शेतकऱ्याला सतावत असताना साखर आयुक्तांनी मात्र सर्व ऊसाचे गाळप केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातील २०० पैकी ११० कारखाने (Sugarcane Factory) सध्या बंद झालेले आहेत. मात्र, उरलेला ऊस गाळण्यासाठी ९० कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण ऊस गाळला जाईल अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे. महाराष्ट्रात जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस गाळप होणे बाकी आहे त्यासाठी अनुक्रमे सोलापूर, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यामध्ये गाळपाची सोय करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : हरियाणात भाजपला मोठा धक्का; अपक्ष आमदारांनी समर्थन घेतल मागे

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT