108 Ambulance Services Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO: १०८ ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या BVG कंपनीचं कंत्राट रद्द, सरकारचा मोठा निर्णय

Priya More

राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. १०८ या सरकारी ॲम्ब्युलन्स सेवा देणारी कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती त्यानंतर इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. कंत्राटदार BVG या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. आता १०८ या क्रमांकाअंतर्गत आरोग्य विभाग स्वत: ॲम्ब्युलन्स सेवा देणार आहे. राज्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी सरकारद्वारे १०८ ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. याचे कंत्राट सरकारने BVG कंपनीला दिले होते. पण या कंपनीने घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते. आता सरकारने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. आता सरकार स्वत: १०८ क्रमांकाअंतर्गत ॲम्ब्युलन्स सेवा देणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT