bus drivers and owners demands parking place in kalyan west saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : बससाठी पार्किंगची जागा द्या, अन्यायकारक कारवाई थांबवा; कल्याण पश्चिम बस मालकांची मागणी

कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना त्यामध्ये आमच्या बसेसच्या पार्किंगचाही विचार केला पाहिजे.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमूख

Kalyan News :

वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या बसवर सुरू करण्यात आलेली कारवाई थांबवावी. तसेच बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कल्याण पश्चिमेतील बस चालकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बस मालक लाेकप्रतिनिधींसह केडीएमसी आयुक्तांची भेट घेत बस पार्किंगच्या जागेची मागणी करीत आहेत. (Maharashtra News)

कल्याण पश्चिम परिसरात विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे 100 च्या आसपास खासगी बसेस आहेत. हे सर्वजण मुंबई बस मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेत वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर नो पार्किंगची कारवाई केली जात आहे.

त्याविरोधात हे सर्व बसमालक एकवटले असून त्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना त्यामध्ये आमच्या बसेसच्या पार्किंगचाही विचार केला पाहिजे. आम्ही सरकारला दरमहिन्याला साधारणपणे 10 हजार ते 30 हजार पर्यंतचे कर भरतो. तरीही आमच्यावर ही नो पार्किंगची कारवाई का असा संतप्त सवाल मुंबई बस मालक संघटनेने केला आहे.

दरम्यान या सर्व बस चालकांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेत त्यांना याप्रश्नी लक्ष घालण्यासाठी साकडे घालण्यात आल्याची माहिती मुंबई बसमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्याचे आवश्यक ते सर्व शुल्क भरण्यासही तयार आहोत. तसेच जोपर्यंत आम्हाला ही जागा उपलब्ध होईपर्यंत वाहतूक पोलिसांकडून सुरू असणारी ही कारवाई त्वरित थांबवण्याची मागणीही मुंबई बस मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT