Mumbai: ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, शर्यतीसाठी हजारोची गर्दी... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Mumbai: ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, शर्यतीसाठी हजारोची गर्दी...

प्रदीप भणगे

डोंबिवली:  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हजारोंची गर्दी जमवत डोंबिवली (Dombivli) जवळील पडले- देसाई गावाच्या (village) माळरानावर बैलगाडा (Bullock cart) शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. एवढी मोठी जत्रा गावात भरली असताना पोलिसांनी (police) त्यावेळी कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या शर्यतीचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाले असून पोलिसांनी फक्त कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण (Rural) भागात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परवानगी दिली आहे. (bullock cart races in rural areas Dombivli)

मात्र, बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) यांची परवानगी, जनावरांची वैद्यकीय चाचणी यांसह अन्य परवानग्या घेण्याची नियमावली (Rules) आखून देण्यात आली होती. मात्र, असे असताना शासनाचे (government) नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे बैलगाडा शर्यतींचे आणि घोडे, बैलांच्या बाजाराचे आयोजन हे करण्यात आले होते. एकीकडे कोरोना (Corona) नियमांचे पालन करण्याचे आवाहन महाराष्ट्र (Maharashtra) शासन करत आहे.

हे देखील पहा-

मात्र, दुसरीकडे डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील देसाई- पडले गावाच्या माळरानावर २६ जानेवारी रोजी बैलगाडा शर्यती भरवण्यात आले होते. मात्र, असे असताना शिळ डायघर पोलिसांना यांची कोणत्याही प्रकारची कुणकुण लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शर्यती पाहण्यासाठी हजारो संख्येने प्रेक्षक जमले होते आणि पाच लाखांपर्यंत लागलेल्या बोल्यामुळे प्रेक्षकांची संख्या ही झपाट्याने वाढली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. या बैलगाडा शर्यतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (bullock cart races in rural areas Dombivli)

मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या काय आहेत. या पोलीस यंत्रणांना देखील माहित नव्हते का? पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का असा सवाल उपस्थित केला जात आहे. एवढी मोठी बैलगाडा शर्यतींची जत्रा गावात भरली आणि पोलिसांच्या यंत्रणांना याची कुणकुण लागत कशी नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. मात्र, याची माहिती प्रसार माध्यमांना मिळताच शिळ डायघर पोलिसांनी फक्त कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुहा दाखल केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान याविषयी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विचारले असता आम्ही गुन्हा दाखल केला आहे असे सांगितले आहे. मात्र, कॅमरा समोर बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त सामान्य लोकांनाच असतात असा सवाल उपस्थित केला जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

Breaking News Live : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

Nana Patole : ''त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका..''; नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT