Navi Mumbai Bridge Collapse  Saam tv
मुंबई/पुणे

bridge collapse update in Uran : मोठी दुर्घटना! उरणमध्ये बांधबंदिस्ती फुटली, दोघांचा मृत्यू

navi mumbai Uran bridge collapse update : नवी मुंबईतून मोठी दुर्घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरण तालुक्यात पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. उरणमधील धुतुम ते दिघोडा खाडी पूल कोसळल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

navi mumbai Uran bridge collapse :

नवी मुंबईतून मोठी दुर्घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरण तालुक्यात बांधबदिस्ती फुटल्याची दुर्घटना घडली आहे. उरणमधील धुतुम ते दिघोडा खाडीची बांधबदिस्ती फुटल्याने मोठा दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईजवळील उरण तालुक्यात खाडीची बांधबंदिस्ती फुटल्याने घटना घडली. उरण तालुक्यातील धुतुम ते दिघोडा खाडी पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पेणवरून आलेली चार लोक बांधबंदिस्ती खाली अडकली होती. त्याचवेळी बांधबंदिस्ती फुटल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उरण पोलीस स्टेशन हद्दीतील दादरपाडा या गावतील गाव ते शेतीला जोडणारा पूल होता. प्रशासनाला या घटनेची माहिती घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरु केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील आदिवासी पाड्यातील चार तरुण मासेमारीसाठी गेले होते. त्याचवेळी उरण तालुक्यातील दिघोडे-धुतूम खाडीची बांधबंदिस्ती फुटली. या बांधबंदिस्तीखाली चार जण अडकले.

आज सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाली. बांधबंदिस्ती फुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील दोन जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT