Crime: सोशल मिडियावर तरुणीला त्रास देणाऱ्या दोघांना अटक  
मुंबई/पुणे

Crime: सोशल मिडियावर तरुणीला त्रास देणाऱ्या दोघांना अटक

हे दोघे पिडीत मुलीला आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईच्या गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) १० च्या पोलिसांनी अल्पवयीन मुलीला सोशल मिडियावर त्रास देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त दत्ताजी नलावडे (Dattaji Nalawade) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

२६ ऑगस्टला हा संपूर्ण प्रकार घडला असून सोशल मिडियावर या मुलांची तिच्यासोबत ओळख झाली होती. कालांतराने हे दोघे पिडीत मुलीला आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकत होते.

याबाबत मुलीने आई-वडिलांना घटना सांगितल्यानंतर मेघवाडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT