Pune: नवले ब्रिजवर सहा वाहनांचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू! (पहा video) सागर आव्हाड, अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

Pune: नवले ब्रिजवर सहा वाहनांचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू! (पहा video)

साधारण 20 ते 22 जणांना नवले हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. ३ मृत्यू, पाच गंभीर, 12 जखमी.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे, अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

सागर आव्हाड, अश्विनी जाधव केदारी

पुणे : नवले पुलावर Nawale Bridge Accident सहा वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. तर सर्व जखमींना नवले हॉस्पिटलमध्ये Nawale Hospital उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवले उड्डाणपूल परिसरात ज्वलनशील द्रवपदार्थ वाहून नेणारा टॅंकर पलटी होवून हा भीषण अपघात झाला आहे.

व्हिडीओ-

अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बंगलुरुकडून पुण्याकडे थिनर घेऊन जाणारा टँकर उतारावर आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने समोरील येईल त्या वाहनांना टँकर धडकवण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, टँकरने सुमारे 15 ते 16 वाहनांना उडवले आहे. तर काही वाहनांना फरफटत ओढ़त नेले आहे.

अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अपघातस्थळी मदतकार्य करणाऱ्यांना अडचण येत होती. दरम्यान पोलिस, अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनतर मदतकार्याला वेग आला. तेथे जमलेल्या जमावाला बाजूला करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवान नागरिकांच्या मदतीने अडकलेली वाहने बाजूला करण्याचे कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.

कालच (ता. २१) गुरुवारी सायंकाळी याच ठिकाणी झालेल्या अपघातात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज पाच जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.

Edited By-Krushna Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT