Amit Shah saam tv
मुंबई/पुणे

Breaking News : अमित शाहांच्या ताफ्यात शिरली संशयास्पद व्यक्ती! पुण्यातील धक्कादायक प्रकार

Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून एका संशयास्पद व्यक्ती अमित शाहांच्या ताफ्यात शिरला.

Dnyaneshwar Choutmal

Breaking News : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून ती व्यक्ती ताफ्यात शिरल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयित व्यक्तिचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. विविध कार्यक्रमानिमित अमित शाह आज पुण्यात आहेत. याच दरम्यान सोमेश धुमाळने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे जवळचे असल्याचे सांगून ताफ्यात प्रवेश केला.

या व्यक्तीने प्रोटोकॅाल तोडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ केंद्रीय मंत्र्यांसोबत असलेल्या पोलीस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. त्याचा माग काढत अखेर स्थानिक पोलिसांनी त्याला गाठले.

सोमेश धुमाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. जेडब्ल्यू मॅरेट हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो नेमका कोण आहे? कोणाच्या वाहनांत बसला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

SCROLL FOR NEXT