Popular Front of India Saam TV
मुंबई/पुणे

टेरर फंडिंग प्रकरणी PFI संघटनेविरोधात सर्वात मोठी कारवाई; महाराष्ट्रासह १० राज्यांतून १०० पेक्षा अधिक अटकेत

PFI ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना असून ही संघटना दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या संघटनेशी संबंधित अनेक संस्था आणि कार्यलयांवर NIA आणि ED ने छापेमारी केली आहे. ही संघटना दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे या संस्थेच्या भारतातील विविध कार्यालयांवर NIA आणि ED ने जवळपास १०६ ठिकाणी छापेमारी केली आहे.

ही कारवाई महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सुरु केली असून आत्तापर्यंत पुणे (Pune), औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीड येथे काल रात्री एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी एटीएस आणि एनआयए'ने संयुक्तपणे केली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. या संघटनेच्या पुण्यातील कार्यालयावर NIA ने छापेमारी केली आहे. या संस्थेने दहशतवाद्यांना (Terrorists) पैसा पुरविल्याचा आरोप करण्यात आला असून या संघटनेत जी ट्रेनिंग दिली जाते या सर्व विषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव सीआरपीएफ'ची एक तुकडी देखील कोंढवा परिसरात दाखल झाली आहे. पुण्यासह देशातील अनेक शहरात आज सकाळपासून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना असून 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर, 1993 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

एनआयए आणि अन्य पोलिस तुकड्यांनी बुधवारी रात्री पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे "पीएफआय"च्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. पुण्यात कोंढवा, हडपसरसह विविध ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत.

देशभरात एकूण 106 जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद बीड परभणी नांदेड अशा चार ठिकाणी येण्याची छापीमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

ATS आणि NIA ने PFI वर देशभरात केलेल्या कारवाया -

महाराष्ट्र २०, केरळ २२, कर्नाटक २०, तामिळनाडू १०, आसाम ९, उत्तरप्रदेश ८, दिल्ली ५, पॉडिचेरी ३, राजस्थान २, मध्यप्रदेश ४ या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा; ₹२००० आले की नाही?

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Maval : मावळच्या तिन्ही नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची सोडत; वडगाव नगराध्यक्ष महिला राखीव

Tudtuda Disease: भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगानं भातपीक फस्त....भातपीक नष्ट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त...|VIDEO

Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, पाहा EXCLUSIVE VIDEO

SCROLL FOR NEXT