Pune MPSC Protest Raj Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नोकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

Pune MPSC Protest Raj Thackeray News : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; नोकऱ्यांबाबत लवकरच चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा.

Alisha Khedekar

  • पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

  • ५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली

  • विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन

  • मुख्यमंत्री या विषयावर सकारात्मक असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांत MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, पेपरफुटीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आवाज उठवत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील विविध राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. मंत्री नितेश राणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमधून दिली आहे.

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ५ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या मागण्या आणि रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. नोकरी मिळवण्यासाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंबापासून दूर राहून मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, असेही त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्रीही या विषयावर सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन

MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो आणि नोकऱ्यांसंदर्भात कोणती घोषणा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत निर्णय किंवा घोषणा होईपर्यंत पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात भक्तांच्या मदतीला धावला 'विठू माऊली'! मंदिर समितीचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार 'एवढा' निधी

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दुष्काळाचे संकट; टँकर बनवण्याच्या कामाला वेग

Mumbai News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! विद्याविहार उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? २.१५ फिटमेंट फॅक्टरचे गणित आत्ताच घ्या समजून

Reserve Fuel: पेट्रोलची रिझर्व्ह लाईट लागल्यावर कार किती किलोमीटर दूर जाऊ शकते?

SCROLL FOR NEXT