Mumbai Kalachowki Area Fire Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Kalachowki Fire: मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग; एकापाठोपाठ ८ सिलिंडर फुटले, अंगावर शहारे आणणारा VIDEO

Kalachowki Fire Accident: मुंबईच्या काळचौकी परिसरात भीषण आग लागल्याची माहिती आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे.

Satish Daud

Mumbai Kalachowki Area Fire Accident

मुंबईच्या काळचौकी परिसरातील मिंट कॉलनीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती आहे. एकापाठोपाठ एक ८ गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील (Mumbai Fire) काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनी येथे ७ ते ८ घरगुती गँस सिलिंडरचे स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सर्वत्र आरडाओरड आणि पळापळ सुरू आहे. काळाचौकी परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT