Mumbai Railway Train Local News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर

Mumbai Railway Train Local News : मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा बदल होणार असून नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या निर्णयामुळे अपघातांवर आळा बसण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजांची एंट्री

  • नॉन-एसी लोकलमध्ये नवीन सुरक्षा सुविधा

  • लटकून प्रवासावर बसणार आळा

  • चाचणीनंतर लवकरच सेवेत दाखल होणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईकरांचा श्वास असलेल्या लोकल सेवेत आमूलाग्र बदल होणार आहेत. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. लोकलच्या ताफ्यात लवकरच देशतील पहिली नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवांची लोकल ट्रेन येणार आहे. येत्या २ दिवसांत ही लोकल ताफ्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात मुंबई लोकलमधून पडून अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना कानावर आल्या. या घटना दुर्दैवी असून प्रवाशांचा निष्काळजीपणा दर्शवते. मात्र आता या घटना रोखण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवाशांचा लटकून प्रवास करणं यामुळे कायमच बंद होणार आहे.

नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ही लोकल ट्रेन आज किंवा उद्या सोलापूर मार्गे मुंबईत आणण्यात येणार असून तिला थेट मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात येईल. त्यानंतर तिथे या लोकलची चाचणी होईल. सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

१२ डब्यांच्या साध्या लोकलला एसी लोकलप्रमाणे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. यातील रेल्वे गाड्या आज किंवा उद्या लोकलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ही लोकल गाडी चैन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेली आहे. त्याचे दरवाजे आपोआप चालू बंद होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Facebook Instagram Down: फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक ठप्प; जगभरातील करोडो नेटकऱ्यांना मोठा फटका

Acidity : चपाती की भात, कोणता पदार्थ वाढवतो ॲसिडीटी?

Moong Dal Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा खमंग आणि स्वादिष्ट मूग डाळ भजी, वाचा रेसिपी

Fact Check: 30 जूनपासून कागदी नोटा बंद? 1 जुलैपासून प्लास्टिकच्या नोटा येणार?

SCROLL FOR NEXT