Breaking News 6 people died in a fire Accident in Goregaon area building Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Goregaon Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावातील ५ मजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Goregaon Fire News: गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Goregaon Fire News

मुंबईतील गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात (Goregaon News) समर्थ नावाची पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली.

बघता बघता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. यामध्ये इमारतीत राहणारे अनेक नागरिक जखमी झाले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आगीत होरपळलेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ५ महिला आणि २ पुरुषांचा मृत्यू झाला. अजूनही ४० जणांवर उपचार सुरू असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

SCROLL FOR NEXT