boyfriend kills girlfriend in pune Saam tv
मुंबई/पुणे

BF Kills GF : गर्लफ्रेंडचा मोबाईलमध्ये आढळला दुसऱ्यासोबत नग्न फोटो; बॉयफ्रेंडची सटकली, केक कापलेल्या चाकूने गळा चिरला

boyfriend kills girlfriend in pune : बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा सपासप वार करून हत्या केली. वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

गोपाल मोटघरे

लॉजमध्ये गर्लफ्रेंडची संशयातून हत्या.

आरोपी दिलावरने हत्या केल्याची कबुली

मोबाईलमधील नग्न फोटो पाहून आरोपीचा राग अनावर

पुणे : पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशायतून बॉयफ्रेंडने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीये. वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलावर सिंग या तरुणाला अटक केलीये. गर्लफ्रेंड दुसऱ्याशी लग्न करणार असल्याच्या निर्णयाने बॉयफ्रेंडने रागाच्या भरात निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलावर सिंग आणि मेरीचे २०१९ सालापासून प्रेमसंबंध होते. मात्र,काही दिवसांपासून दिलावरला मेरीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. सततच्या वादामुळे मेरीने दुसऱ्या बॉयफ्रेंडशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिलावर रागात होता.

दिलावरने मेरीला पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरातील लॉजवल बोलावले होते. दोघांनी लॉजवर वाढदिवस साजरा केला. यावेळी दिलावरने मेरीचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईलचे मेरीचे दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत नग्न फोटो होते. दोघांचे फोटो पाहून दिलावर संतापला. दिलावरने केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने मेरीवर सपासप वार केले. दिलावरच्या हल्ल्यात मेरीचा जागीच मृत्यू झाला.

मेरीची हत्या केल्यानंतर दिलावर स्वत: कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. 'मी माझ्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचे दिलावरने पोलिसांना सांगितले. या हत्याकांडानंतर वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचून मेरीचा मृतदेह ताब्यात घेतला.पोलिसांनी या प्रकरणी दिलावर सिंगला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

प्रेमाचा भयानक शेवट

डी-मार्टमध्ये काम करणारी मेरी आणि हॉटेल व्यावसायिक दिलावरच्या प्रेमात पडली. सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून त्यांची मैत्री झाली. पुढं एकमेकांवर प्रेम जडलं. मात्र, संशयातून या प्रेमाचा भयानक शेवट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT