Lonikand Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: सचिन शिंदेच्या हत्येचा बदला हत्येने! मुलाची चूक, बाप-लेकाचा गेला जीव

शहरात तसेच पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) भागातील गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पुण्यात पुन्हा एकदा हत्याकांडाने शहर हादरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : शहरात तसेच पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) भागातील गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पुण्यात पुन्हा एकदा हत्याकांडाने शहर हादरले आहे. हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपी आणि त्याच्या वडिलांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोणीकंद (Lonikand) परिसरात ही घटना घडली आहे. (Boy and his father killed by group of 6 people in Lonikand of Pune)

या हत्याकांडबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, सनी शिंदे आणि कुमार शिंदे अशी मृतकांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी सचिन शिंदे (Sachin Shinde) या तरुणाची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात सनी शिंदे हा आरोपी होता आणि तो अटकेतही होता. नुकताच सनी शिंदे हा जामीनावर (Bail) बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आलेल्या सनी शिंदे याचा टोळक्याने हत्या केली आहे. (Pune Crime News)

हे देखील पहा-

काय घडलं नेमकं?

सनी शिंदे हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घराकडे निघाला होता. त्यावेळी एका टोळक्याने त्याला गाठले आणि त्याच्यावर हल्ला चढवला. तसेच शस्त्राने सनी शिंदे याच्यावर सपासप वार केले. इतकेच नाही तर जखमी झालेल्या सनीला टोळक्याने दगडाने ठेचले. हे पाहून सनीचे वडील कुमार शिंदे हे त्याच्या बचावासाठी आले, यावेळी संतप्त झालेल्या टोळक्याने त्यांच्यावरही हल्ला केला. (Crime Latest & Breaking News Marathi)

या हल्ल्यात सनी शिंदे आणि आणि त्याचे वडील कुमार शिंदे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते, त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस गजानन पवार (Pune Police) घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीस पुढील तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सचिन शिंदे या तरुणाच्या हत्या प्रकरणातून सनी शिंदे आणि कुमार शिंदे यांची हत्या झाली आहे. सचिन शिंदे याच्या हत्या प्रकरणात सनी शिंदे हा अटकेत होता. सचिन शिंदे याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी सनी शिंदे याच्यावर हल्ला चढवला. यात बाचावासाठी गेलेल्या त्याच्या वडिलांचाही यात मृत्यू झाला. मात्र, हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. (Crime news marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT