UP Elections 2022: नवाब मलिक घेणार सपा नेते अखिलेश यादव यांची भेट...

UP Elections 2022: उत्तर प्रदेशात सपाबरोबर (Samajwadi Party) आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.
UP Elections 2022: Nawab Malik will meet SP leader Akhilesh Yadav
UP Elections 2022: Nawab Malik will meet SP leader Akhilesh YadavSaam News Digital

रश्मी पुराणिक, मुंबई

लखनऊ: देशात यावर्षी उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्हीही पक्ष जोरदार तयारी करत आहे. उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) विचार करता मागच्या विधानसभेत भाजपची एकहाती सत्ता आली होती. मात्र यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP) हा मुळचा महाराष्ट्रातला पक्ष आता उत्तर प्रदेश निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे. (UP Elections 2022: Nawab Malik will meet SP leader Akhilesh Yadav)

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशमधील सत्ता समीकरणांच्या जुळवा जुळवीसाठी राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी ही भेट होणार असून यावेळी सपाचे अनेक बडे नेतेही उपस्थित असणार आहेत. उत्तर प्रदेशात सपाबरोबर (Samajwadi Party) आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.

UP Elections 2022: Nawab Malik will meet SP leader Akhilesh Yadav
UP: तंदुरी रोटीवर थुंकून स्वयंपाक केल्याचा किळसवाणा प्रकार, Video व्हायरल!

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ३०५ जागा जिंकत भाजपने विरोधकांना चिटपट करत एकहाती सत्ता आणली होती. २०१७ मध्ये भाजप ३०५ जागा, अपना दल सोनेलाल ८ जागा, समाजवादी पार्टी ६० जागा, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ४ जागा, प्रगतीशील समाज पार्टी (लोहिया) १ जागा, बहुजन समाज पार्टी ४ जागा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ३ जागा, जनसत्ता दल (लोकतांत्रिक) २ जागा आणि अपक्ष ५ जागा अशा एकुण ४०३ जागा आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com