boost in maval rose production farmers to encash prior to valentines day 2024 saam tv
मुंबई/पुणे

Valentine Day निमित्त मावळातून तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, शेतकऱ्यांची लगबग सुरू

दिलीप कांबळे

Maval News :

जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी (valentine day 2024) सज्ज होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का... या तरूणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. मावळ मधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत. यामुळे थोडेथोडके नव्हे तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. (Maharashtra News)

संपूर्ण जगभरातील तरूणाईंना उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन ‘डे’ अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे.

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी 'व्हॅलेंटाईन ‘डे’ ला मावळातून पंचवीस ते तीस लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार आहे. आपले प्रेम भावना व्यक्त करणारा व्हॅलेंटाईन ‘डे म्हणजे चौदा फेब्रुवारीला साजरा केला जाताे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दिवशी देश विदेशातून गुलाबाला मोठी मागणी असते. चांगल्या प्रतीच्या गुलाब उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यांपासून दिवस-रात्र शेतात राबत आहे. वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची फुलाला मोठी मागणी असते. फुलांच्या दराची प्रतवारी हि लांबीनुसार ठरली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत चाळीस ते साठ सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते.

मावळातून गुलाबाची निर्यात

व्हॅलेंटाईन ‘डे’ ला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल,पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढ-या रंगाच्या अविलॉंस या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथोपिया या देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मावळातील गुलाबाची निर्यात केली जाते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT