Kedar dighe saam tv
मुंबई/पुणे

केदार दिघेंना मुंबई सत्र न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

शिवसेनेचे केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केदार दिघेंवर फक्त धमकीचा आरोप असून बलात्कार प्रकरणात त्यांचा कोणताही संबध नसल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. केदार दिघे यांच्या कोठडीची आवश्यकता नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar dighe) यांच्यासह त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला होता. केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप एका महिलेने केला. या बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी केदार दिघे यांच्या विरोधात पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Kedar dighe news )

ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्यासह त्यांच्या मित्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचा केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप आहे. या बलात्कार पीडित महिलेने केदार दिघे यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसात जाऊन केली. त्यानंतर पीडित महिलेच्या जबानीवरून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्या त्यांच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेने ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर ठाण्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या केदार दिघे यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT