प्रियकराकडे पैसे मागणे हा गुन्हा होत नाही, हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं कारण होऊ शकत नाही, असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवलं आहे. प्रियकराकडे पैसे मागणे, म्हणजे त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं होत नाही, हा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. हा निकाल देत असताना प्रेयसीवर दाखल करण्यात आलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Bombay High Court Observation) न्यायालयाने रद्द केला आहे.
न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी त्यांनी एक खटला रद्द केला आहे. नवघर येथे हा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी 2022 मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा (Mumbai News) दाखल करण्यात आला होता. प्रेयसीने हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या याचिकेला परवानगी दिली आहे.
प्रेयसी दैनंदिन खर्चासाठी प्रियकराकडे पैसे मागत होती, त्यामुळे तिच्यावर प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवघर येथील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली (Asking Money From Boyfriend) होती. त्याच्या भावाने मृत तरूणाची प्रेयसी त्याच्याकडे सतत पैसे मागत होती, त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्याने भावाच्या प्रेयसीवर आत्महत्येस (End Life) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी तरूणीने न्यायालयात धाव घेतली होती. तिने हा गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. मृत तरूणाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. यामध्ये त्याची प्रेयसी त्याच्याकडे सतत पैसे मागत असल्यामुळे त्याने दबावाखाली जीवन संपवल्याचा उल्लेख (Court News) केला होता.
याप्रकरणी तरूणीने न्यायालयात सांगितले की, त्यांचे प्रेमसंबंध होते. तिने त्याला कधीही पैशांसाठी धमकावले नव्हते. तिने सापडलेली चिठ्ठीमध्ये तफावत असल्याचं सांगितलं होतं. तिने शेवटचा मेसेज त्याला १५ दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचा आणि तिचा पैसे मागण्याचा काहीही संबंध नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि तरूणीविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.