Bombay High Court Saam Tv
मुंबई/पुणे

Bombay High Court : एवढी अनधिकृत कामे कशी काय झाली? मुंबई पालिकेला हायकोर्टानं फटकारलं

Action on Unauthorized Construction : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करा असे बजावण्यात आले आहे.

Ruchika Jadhav

सचिन गाड, मुंबई

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेसह सिडको आणि एमआयडीसीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. दिलेल्या निर्देशांचं अद्याप पालन अद्याप न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या बद्दल तीव्र शब्दात नाराची देखील व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात २०१८ साली मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला निर्देश दिले होते. आता २०२४ सुरू आहे मात्र अद्याप या निर्देशांचे पालन झालेले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करा असे बजावण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी नियोजन प्राधिकरणांना ही शेवटची संधी असणार आहे.

अनधिकृत बांधकामांचा निष्कासन करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने २०१५ साली दिले होते. मात्र अद्याप एकही पथक गठीत न झाल्याच समोर आली आहे. ही माहिती मिळताच मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणांना ताशेरे ओढले आहेत.

आयएएस अधिकाऱ्यांना रस नसून कर्तव्याचे देखील पालन होत नसल्याच उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? एवढी अनधिकृत कामे कशी काय झाली?, बांधकाम होत असताना प्राधिकरण काय करत होते? अशी प्रश्नाची सरबत्ती उच्च न्यायालयाने केली आहे.

कोणी काहीही करायला मोकळा आहे, कशावरही कोणताही प्रतिबंध नाही. या सगळ्याला नवी मुंबई महापालिका जबाबदार आहे. या सगळ्याकडे आम्ही कानाडोळा करू शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई आयुक्तांना बजावलं आहे. तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT