bombay high court important verdict on Husband Wife Clash SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai High Court: बायकोने केलेल्या जेवणाला नाव ठेवणं क्रूरता नाही, मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण

Bombay High Court Verdict: बायकोने केलेल्या जेवणाला नाव ठेवणं ही भारतीय दंडसंहितेच्या कलम 498 A अन्वये क्रूरता ठरत नाही, असं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे.

Satish Daud

Bombay High Court important Verdict on Husband Wife Clash

पत्नीने केलेल्या स्वयंपाकावर नवऱ्यानं किंवा सासरच्या लोकांनी नकारात्मक टिप्पणी करणं अथवा जेवणाला नाव ठेवणं ही भारतीय दंडसंहितेच्या कलम 498 A अन्वये क्रूरता ठरत नाही, असं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे. तसेच महिलेले पतीविरोधात दाखल केलला गुन्हाही कोर्टाने रद्द केला.

कलम 498A नुसार, एखाद्या महिलेच्या पतीने किंवा सासरकडील मंडळींनी तिच्यावर अत्याचार केल्यास 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाचीही शिक्षा होऊ शकते, असंही हायकोर्टाने नमूद केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १३ जुलै २०२० साली तिचा विवाह एका तरुणासोबत झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये खटके उडाले. नोव्हेंबर महिन्यात सासरच्या मंडळींना महिलेला घराबाहेर काढले. (Latest Marathi News)

यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत पतीसह सासरकडील मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पती आणि सासरकडील मंडळी जेवणावरून सातत्याने त्रास देऊन छळ करायचे असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं.

लग्न झाल्यानंतर पतीने आपल्यासोबत एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित न केल्याचा दावाही महिलेने पोलीस तक्रारीत केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह सासरकडील मंडळींवर कलम 498A नुसार गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी महिलेच्या पतीने मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि एन.आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

याचिकेवर सुनावणी घेताना हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. आयपीसीच्या कलम 498A नुसार पती-पत्नीमध्ये जेवणावरून झालेली क्षुल्लक भांडणे ही क्रूरता ठरत नाही, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने महिलेच्या पतीवर दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT