DU professor GN Saibaba Saam TV
मुंबई/पुणे

Bombay High Court: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले प्राध्यापक साईबाबा यांची निर्दोष मुक्तता; माओवाद्यांशी संबंध असल्याचा होता आरोप

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Mumbai Latets News: मुंबई उच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच्यावर बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप होता. 2017 मध्ये ट्रायल कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांनी त्याविरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर विभागीय खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव आणि अनिल पानसरे यांनी त्यांची याचिका स्विकारली आणि शुक्रवारी या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने त्यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. (Mumbai High Court News)

साईबाबा यांच्याव्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या खटल्यातील अन्य पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या पाच आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. या पाचपैकी कोणावरही अन्य गुन्हा दाखल नसेल, तर त्यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

माओवाद्यांशी हातमिळवणी केल्याचा होता आरोप

मार्च 2017 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने साईबाबा आणि इतरांना दोषी ठरवले होते. त्यांच्यामध्ये एक पत्रकार आणि एक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी होता. माओवाद्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि देशात अशांतता निर्माण केल्याचा आरोप होता. न्यायालयाने त्यांना अनेक कायद्यांतर्गत दोषी ठरवले. या कायद्यांमध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) संबंधित कलमे होती.

तुरुंगातूनही प्रशासनावर साईबाबा यांचे आरोप

काही काळापूर्वी प्रोफेसर साईबाबा यांनी तुरुंगात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. कारागृहात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचा आरोप ते करत होते. हे सीसीटीव्ही कॅमेरे बाथरूम आणि टॉयलेटची दृश्येही टिपत आहेत असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या पत्नी आणि भावानेही या संदर्भात महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्र्यांना पत्र लिहून कारागृहातील हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली होती. साईबाबा हे अपंग असल्यामुळे त्यांना व्हील चेअरवर राहावे लागते. सध्या ते त्यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT