वसईत हेफ्ट कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

वसईत हेफ्ट कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू

वसई मधील हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनी मध्ये स्फोट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नालासोपारा : वसई Vasai मधील हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनी Heft Engineering Vibrationमध्ये स्फोट होऊन, एका कामगाराचा मृत्यू Death झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवार या दिवशी दुपारी ३ च्या वेळेस ही घटना घडली आहे. या स्फोटची तीव्रतेमुळे कंपनीसह जवळील कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

हेफ्ट कंपनी मध्ये झालेल्या या स्फोटामध्ये नेमुद्दीन मोहम्मद करीम सलमानी (वय- १८) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, अन्वर सिद्बिकी आणि विनोद यादव हे कामगार जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने जवळील कंपनीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे संबंधित कंपनी मालकाने हेफ्ट कंपनीचे मालक सुधाकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी हेफ्ट कंपनीच्या मालकाविरोधात भादवी ३०४, (आ) २८७, ४२७ प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,मुंबई आणि अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गच्या बाजुला तुंगार फाटा या ठिकाणी ही हेफ्टी कंपनी आहे. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीत बॉयलर मधील अधिक प्रेशरने स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये बाजूला असलेल्या, डॉल्फिन कंपनीच्या सामाईक भिंतीला भगदाड पडले आहे. इतकेच नाही तर या कंपनी मधील १८ वर्षीय कामगाराचाही त्यात मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT