Bogus Promotion Scam: महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली बोगस पदोन्नती! - Saam TV
मुंबई/पुणे

Bogus Promotion Scam: महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली बोगस पदोन्नती! (व्हिडिओ)

महसूल खात्यातील पाच वरीष्ठ अधिकाऱ्यांना बनावट पदोन्नतीच्या आदेशाने प्रमोशन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी महसूल विभागाच्या अवर सचिवांनीचं बोगस शासन आदेश प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : महसूल खात्यातील पाच वरीष्ठ अधिकाऱ्यांना बनावट पदोन्नतीच्या आदेशाने प्रमोशन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी महसूल विभागाच्या अवर सचिवांनीचं बोगस शासन आदेश प्रकरणी तक्रार दाखल केली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station Mumbai) यासंदर्भात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आलाय. (Bogus promotion scam in maharashtra revenue department)

महसूल विभागातील (Revenue Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट आदेशाद्वारे पदोन्नती करण्यात आल्याचं उघड झालंय. 6 जानेवारीला हे बोगस आदेश काढण्यात आले. शासन (Maharashtra Government) परिपत्रक आणि आदेशानुसार हुबेहूब संपूर्ण माहितीनिशी हा आदेश काढण्यात आला असला तरी भारतीय प्रशासकीय सेवेत अपर जिल्हाधिकारी संवर्गाला पदोन्नतीनं नियुक्ती देणं, हा विषय महसूल विभागाशी संबंधित नाही.

भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 5 अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत समायोजित करून पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदस्थापनेबाबतचा आदेशच बोगस असल्याचं उघड झालंय.

बनावट आदेशाने पदोन्नती असा आहे प्रकार

  • - महसूल मंत्र्यांच्या कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची पदोन्नतीनं प्रधान खासगी सचिव महसूल या पदावर

  • - उन्मेष महाजन यांची गोंदिया जिल्हाधिकारी पदी

  • - ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संकेत चव्हाण यांची त्याचं ठिकाणी पदोन्नती

  • - अमरावतीच्या अपर जिल्हाधिकारी मनीषा वाजे यांची अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

  • - तर भंडारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची त्याचं ठिकाणी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले.

महसूल मंत्रालयानेचं महसूल विभागातील बोगस आदेश उघड केल्यानं महसूल विभागात खळबळ उडालीय. आता या प्रमोशनच्या बोगस आदेशामागे नेमकं सूत्रधार कोण आहे? हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असून या प्रकरणी पोलीस तपासात नेमकं काय सत्य समोर येतंय, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stale Rice: शिळा भात सतत खाल्ल्याने काय फरक पडतो?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

SCROLL FOR NEXT