Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हात-पाय बांधलेले असल्याने हत्येचा संशय

सुरज सावंत

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील (Mumbai) कुर्ला पूर्व येथील बंटर भवन परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह एक गोणीत भरलेला होता आणि त्या महिलेचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. काल, बुधवारी सकाळी एका वाटसरुला हा मृतदेह दिसल्याने त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. महिलेचे हात पाय दोरीने बांधलेले आढळल्याने त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. (Mumbai Crime News)

नेहरूनगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने माहीती दिली की, "जवळपास 25 वर्षे वयाच्या महिलेचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते, ज्यामुळे संशय येतो की नाल्यात टाकण्यापूर्वी तिची हत्या (Murder) करण्यात आली होती." हा मृतदेह आधी एका वाटसरूला दिसला आणि नंतर त्याने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. (Tajya Batmya)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT