Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Tv

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर ८० कोटींचे अंमली पदार्थ जप्त; एकाला अटक

Mumbai Crime News : डीआरआयने 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहेत.
Published on

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) मुंबई डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानेने ड्रग्जसह एका नागरिकाला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी ट्रॉली बॅगमध्ये बनवलेल्या बनावट पोकळीत ड्रग्ज लपवले होते. डीआरआयने 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहेत. (Tajya Batmya)

Mumbai Crime
Shivsena Dasara Melava: कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी? मुंबई पोलिसांच्या आकडेवारीने नवा वाद

जप्त केलेल्या या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 80 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी बिनू जॉन नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असून तो केरळचा रहिवासी आहे. (Mumbai Crime News)

३ ऑक्टोबरलाही महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन राज्यांमध्ये हे सर्च ऑपरेशन केले असून तब्बल 5.3 किलो गांजा जप्त केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, DRI, मुंबईच्या अधिकार्‍यांनी, विदेशी पोस्ट ऑफिस, मुंबई (Mumbai) येथे 'खाद्य वस्तू'तून होत असलेल्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमधून 3.5 किलो हायड्रोपोनिक वीड DRI च्या अधिकार्यांनी जप्त केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com