दोन वर्षापुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा पुरलेला मृतदेह सापडला! SaamTvNews
मुंबई/पुणे

दोन वर्षापुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा पुरलेला मृतदेह सापडला!

मात्र दोन वर्षानंतर मुलगी सापडली नाही तर मुलीचा मृतदेह सापडल्याने आईवडिलांच्या डोळ्यासमोर दुखाचा डोंगर उभा राहिला...

रोहिदास गाडगे

आंबेगाव : दोन वर्षापुर्वी १७ वर्षीय बेपत्ता झालेल्या आंबेगाव तालुक्यातील नाव्हेड गावातील आदिवासी (Aadivasi) बेपत्ता मुलीचा मृतदेह शोधण्यात घोडेगाव पोलीसांना यश आले आहे. सखुबाई शंकर घोडे असे मुलीचे नाव आहे. मुलीचा (Girl) संशयास्पद मृत्यु झाला असून या प्रकरणाचा कसुन तपास करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी सांगितले.

हे देखील पहा :

दोन वर्षापुर्वी बेपत्ता झालेल्या मुलगीने आत्महत्या (Suicide) केली असावी म्हणुन मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घोडेगाव (Ghodegaon) पोलीसांत दिली होती. त्यानुसार घोडेगाव पोलीसांकडुन बेपत्ता महिला, मुली आणि नागरिकांची शोध मोहिम सुरु असताना दोन वर्षापुर्वी रहात्या घरातुन बेपत्ता झालेल्या सखुबाई शंकर घोडे वय १७ वर्ष या मुलीचा शोध घेत असताना नोव्हड येथील घोडनदी पात्रालगत तिचा मृतदेह गाडल्याची माहिती घोडेगाव पोलीसांना मिळाली.

त्यानुसार घोडेगाव पोलीसांनी (Police) आज तहसिलदार रमा जोशी यांच्या उपस्थित मुलीच्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला असुन शवच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मुलीचा मृत्यु कसा झाला याबाबत अद्याप कळु शकले नाही. मात्र दोन वर्षानंतर मुलगी सापडली नाही तर मुलीचा मृतदेह (Death Body) सापडल्याने आईवडिलांच्या डोळ्यासमोर दुखाचा डोंगर उभा राहिला...

घोडेगाव पोलीसांकडुन बेपत्ता महिला नागरिक आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणावर कसुन काम सुरु असताना घोडेगाव पोलीसांनी सहा महिन्यात 7 पुरुष, 14 महिला,1 मुलगा आणि 14 अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT