12th Exams: पुण्यात खासगी क्लासमध्ये बोर्डाचं परिक्षाकेंद्र अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

12th Exams: पुण्यात चक्क खासगी क्लासमध्ये बोर्डाचं परिक्षाकेंद्र; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार...

12th Exam Latest News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यामध्ये चक्क एक परीक्षा केंद्रच गायब झालय. टिळक रस्त्यावर एका इमारतीमध्ये राव जूनियर कॉलेज आहे. याठिकाणी बारावीच परीक्षा केंद्र आहे. प्रत्यक्षात जाऊन बघितलं असता तिथं परीक्षा केंद्राचा (Exam Center) काहीच ठावठिकाणा नाहीए. विशेष म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटवर याच पत्त्याची नोंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली, तेव्हा पुलगेट येथील सोलापूर बाजार परिसरातील एका खासगी क्लासमध्ये ही बारावीची परीक्षा (12th Board Exam) घेतली जात असल्याचं समोर आलं आहे. (Board's examination center in private class in Pune; Education department's mismanagement)

हे देखील पहा -

धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण मंडळाला याचा मागमूसही नाही. याबाबत प्रश्न विचारले असता या तथाकथित परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षिकेने अक्षरशः थातुर मातुर उत्तरं देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. एकूणच परीक्षेतील गैरप्रकारांना प्रोत्साहन देणारा हा प्रकार असल्याचा संशय येतो. यासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळ (Education Department) आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. आज त्या केंद्रावर पेपर सुरू नव्हता. मात्र ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT