Student Death in Podar Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Poddar Hospital: वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये BMSच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप, विद्यार्थ्यांचे आंदोलन

Latest News: वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायामध्ये बीएमएसचे शिक्षण घेणारा विद्यार्थी दयानंद काळे ( 22 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे.

Priya More

निवृत्ती बाबर, मुंबई

Mumbai News: मुंबईतल्या वरळी येथील पोद्दार रुग्णालयामध्ये (Poddar Hospital) बीएमएसच्या विद्यार्थ्याचा (BMS Student) उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील ओपीडी बंद करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायामध्ये बीएमएसचे शिक्षण घेणारा विद्यार्थी दयानंद काळे ( 22 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. दयानंद काळे हा बुधवारी रात्री झाडावरुन पडून जखमी झाला होता. दयानंदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोद्दार महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्येच उपचारादरम्यान दयानंदचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

दयानंद काळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी करत आंदोलन सुरु केले आहे. या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलची ओपीडी बंद केली आहे. याप्रकरणी कुठलीही कारवाई न करता विद्यार्थ्यांवरच दडपशाही केली जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

या प्रकराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या महाविद्यालयाच्या डीनने जखमी दयानंदला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही आणि उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दयानंद शिकत असलेल्या महाविद्यालयाच्याच हॉस्पिटलमधील सेवा अभावी आणि तत्परता दाखवली नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला, असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT