BMC Yashvant Jadhav  SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कोविड पॉझिटिव्ह !

शिवसेना खासदार अरविंद सावंत हे नुकतेच कोविडबाधित आढळून आले असून यशवंत जाधव हे एका कार्यक्रमात एकत्रित आले होते.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या अशा स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांना कोविडची बाधा झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यांना माझगाव येथील प्रिन्स अली खान या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंर्भातील माहिती यशवंत जाधव यांनी स्वतः सोशल मिडियावर मेसेज व अहवाल पाठवून दिली आहे.

हे देखील पहा :

तसेच, गेल्या २ - ३ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) हे नुकतेच कोविड (covid) बाधित आढळून आले असून यशवंत जाधव हे एका कार्यक्रमात एकत्रित आले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यशवंत जाधव यांचे सहाय्यकसुद्धा कोविड बाधित आढळून आले आहेत. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत.

मात्र, कोविड बाधित असतांनाही यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी आज स्थायी समितीची ऑनलाइन बैठक घेतली. मात्र, दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ व भाजप आमदार आर. एन. सिंह यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पित करून या बैठकीत नियमित कामकाज न करता बैठक तहकुब करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT