BMC Scam X
मुंबई/पुणे

BMC : मुंबईत उंदीर घोटाळा? बीएमसीचा कोट्यवधींच्या निधीवर डल्ला? उंदीर मारण्याची मोहीम संशयाच्या घेऱ्यात

BMC Scam : तुम्ही आदर्श, जलसिंचन, राष्ट्रकुल अशा घोटाळ्यांची नावं ऐकली असतील.. मात्र आता राज्यात उंदीर घोटाळ्याने खळबळ उडवलीय.. मात्र हा उंदीर घोटाळा नेमका काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Yash Shirke

घरात धुडघूस घालणाऱ्या उंदरांमुळे मुंबईकर हैराण आहेत.... त्यामुळेच उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेने मोहीम हाती घेतलीय.. मात्र या उंदीर मारण्याच्या मोहीमेतच घोटाळा झाल्याची चर्चा रंगलीय.. कारण मुंबई महापालिकेने अवघ्या 6 महिन्यात तब्बल अडीच लाख उंदीर मारल्याचा दावा केलाय...त्यामुळे ही आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय...

मुंबईत उंदीर घोटाळा?

- 6 महिन्यात 17 वॉर्डमध्ये 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा

- एक उंदीर मारण्यासाठी 20 रुपये दर

- टार्गेटपेक्षा जास्त उंदीर मारल्यास 22 रुपये दर

- 5 वॉर्डमधील उंदीर मारण्यासाठी पालिकेचा 1 कोटी खर्च

- 5 वर्षात महापालिकेचा उंदीर मारण्यावर 23 कोटींचा खर्च

महापालिकेच्या दाव्यानंतर अजूनही मुंबईत गल्लोगल्ली उंदरांची टोळी दिसते... मात्र महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करत आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत चौकशीचे आदेश दिलेत...

दरवर्षी मुंबई महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते... मात्र ही मोहीम कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे की खरंच उंदीर मारले जात आहेत? हा मोठा प्रश्न आहे. बेजबाबदार आणि भ्रष्टा अधिकाऱ्यांवर कोणाचाच अंकूश नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी खरच प्रत्यक्षात 23 कोटींचे उंदीर मारले की केवळं कागदावर मारुन पैसे खाल्याची मस्त ढेकर दिली याचं सत्य चौकशीनंतरच समोर येणार आहे. उंदराला मांजर साक्ष या म्हणीनुसार हा घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीही पाठीशी घालणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Skin Symptoms: लिव्हरमध्ये बिघाड झालाय कसं ओळखायचं? त्वचेवर दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; हार्वर्ड तज्ञांचा इशारा

Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Veg kolhapuri Recipe: हॉटेलस्टाईल व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, सोमवारी साधणार संवाद

Panipuri Puri Recipe : घरच्या घरी क्रिस्पी पानीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या? वापरा ही सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT