Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

हेल्दी नाश्ता

जर तुम्ही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी खायचा विचार करत असाल तर पनीरची अप्रतिम रेसिपी नक्की करून पाहा.

Paneer Bhurji Recipe

पनीरची भुर्जी

पनीरची भुर्जी बनवायला अगदी सोपी आहे. ही भुर्जी चपाती किंवा पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता.

Healthy Breakfast

साहित्य

पनीर, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, हिंग, धणे पूड, पाव भाजी मसाला, ढोबळी मिरची, लसूण, आलं, हिरवी कोथिंबीर, तेल, मीठ इ.

Indian Breakfast Recipe

स्टेप १

पनीरची भुर्जी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्या.

Protein Rich Food

स्टेप २

पुढे एका भांड्यात पनीर घेऊन ते कुस्करुन बाजुला ठेवा. मग कढईत फोडणीसाठी तेल घाला.

Protein Rich Food

स्टेप ३

तेलात जिरं आणि हिंग घालून फोडणी द्या. मग त्यामध्ये कांदा, आलं- लसणाची पेस्ट मिक्स करा. पुढे ढोबळी मिरची, टोमॅटो मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यात मसाले घाला.

Protein Rich Food

स्टेप ४

आता मसाले मंद आचेवर किमान १ मिनिट परतून घ्या. यानंतर, बारीक चिरलेली सिमला मिरची घालून भाज्या मऊ होईपर्यंत मिश्रण शिजवा.

Protein Rich Food

स्टेप ५

आता त्यात मॅश पनीरचा चुरा घालून मिश्रण मिक्स करा. यानंतर, चवीनुसार मीठ घालून पनीर भुर्जी झाकून ३ ते ४ मिनिटं शिजवा. यानंतर, गॅस बंद करा, हिरव्या कोथिंबिरीने सजवून गरमागरम पनीर भुर्जी सर्व्ह करा.

Protein Rich Food

NEXT: IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

motivational success story
येथे क्लिक करा